पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ची उल्लेखनीय कामगिरी; पालखी सोहळ्यात दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने रंगेहात अटक केली. आरोपींकडून सुमारे ₹१.५० लाख किमतीची १३ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसूत्र मणी गंठण जप्त करण्यात आले.
पुणे | प्रतिनिधी : रोहन सोनाळे
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने रंगेहात अटक केली. या कारवाईत आरोपींकडून १३ ग्रॅम वजनाचे सुमारे ₹१.५० लाख किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र (मणी गंठण) जप्त करण्यात आले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार पालखी सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षेसाठी गुन्हे शाखा युनिट-३ ची विशेष पथके साध्या वेशात तैनात करण्यात आली होती. आळंदी ते बोपखेल फाटा या मार्गावर वारकऱ्यांसोबत पायी गस्त घालत असताना पोलिसांनी संशयित हालचालींवर लक्ष ठेवले.
दरम्यान, पालखी दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन महिलांनी हिसकावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तात्काळ पाठलाग करून दोन्ही महिलांना पकडण्यात आले. चौकशीत त्यांच्याकडून चोरी केलेले १३ ग्रॅम वजनाचे सुमारे ₹१.५० लाख किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
या प्रकरणी फिर्यादी सुनिता नारायणराव रावत (वय ५०) यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुदर्शन साईदास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार सुरेखा बोरेसे, बाबासाहेब गरजे, सोमनाथ बोहाडे, दिलीप राठोड, निखिल फापाळे आणि स्वप्नील महाले यांनी सहभाग घेतला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0