राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; पहिल्याच दिवशी ₹12.40 कोटींची कमाई
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ₹12.40 कोटींची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. हा मराठी सिनेमासाठी सर्वाधिक ओपनिंग डे ठरला आहे.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ₹12.40 कोटींची निव्वळ कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम नोंदवला आहे.
‘राजा शिवाजी’ हा कोणत्याही मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक ओपनिंग डे ठरला असून, २०२६ मधील सर्व भाषांतील चित्रपटांमध्ये तिसरा सर्वाधिक ओपनिंग डे नोंदवणारा चित्रपट ठरला आहे.
१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वाहिलेल्या या भव्य चित्रपटाला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
विशेषतः कुटुंबांसह मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळत असून, अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल शोची नोंद झाली आहे. चित्रपटातील भव्यता, कथा, अभिनय आणि तांत्रिक बाजूंचे समीक्षकांनीही कौतुक केले आहे.
हिंदी आणि मराठी माध्यमांमधील सकारात्मक परीक्षणे तसेच प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘राजा शिवाजी’ आगामी दिवसांत आणखी मोठी कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा चित्रपट एक मोठा टप्पा मानला जात असून, ऐतिहासिक विषयावरील सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय मानला जात आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0