राजधानीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते प्रतिमा आणि पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

May 31, 2026 - 21:58
 0  3
राजधानीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, अहिल्याबाई होळकर जयंती

नवी दिल्ली | प्रतिनिधी

थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राज्यकर्त्या आणि आदर्श प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन परिसरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे तसेच महाराष्ट्र सदनातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्याचा आणि समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा थोडक्यात परिचय उपस्थितांना करून दिला.

भारतीय इतिहासातील आदर्श राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी न्यायप्रिय प्रशासन, समाजकल्याण, धर्मकार्य आणि लोकसेवा यांद्वारे देशाच्या इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याचा आदर्श आजही समाजासाठी प्रेरणादायी मानला जातो.

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या लोककल्याणकारी विचारांना आणि कार्याला उजाळा देण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0