इंधन दरवाढ म्हणजे सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम – आकाश छाजेड
इंधन दरवाढीवर नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महागाईने आधीच सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना इंधन दरवाढ अन्यायकारक असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.
नाशिक ब्यूरो
नाशिक : इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. महागाईमुळे आधीच सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना इंधन दरवाढ करून सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
आकाश छाजेड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील सर्वसामान्य नागरिक आधीच वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत इंधन दरवाढ करून केंद्र सरकारने जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला आहे.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान देशवासीयांची दिशाभूल करत असून काटकसरीच्या नावाखाली सातत्याने दरवाढ केली जात आहे. ही भूमिका अत्यंत अन्यायकारक असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामान्य जनतेचे डोळे आता उघडले असून आगामी काळात जनता या धोरणांना योग्य उत्तर देईल, असा इशाराही आकाश छाजेड यांनी दिला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0