रुग्णवाहिकांचे दरपत्रक वाहनात आणि हॉस्पिटल गेटवर प्रदर्शित करणे बंधनकारक; प्रशासनाचे निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णवाहिकांचे निश्चित दर वाहनात तसेच हॉस्पिटल गेटवर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजूर केलेल्या दरांनुसार विविध प्रकारच्या रुग्णवाहिकांसाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

Apr 30, 2026 - 19:38
 0  8
रुग्णवाहिकांचे दरपत्रक वाहनात आणि हॉस्पिटल गेटवर प्रदर्शित करणे बंधनकारक; प्रशासनाचे निर्देश
रुग्णवाहिका भाडे, हॉस्पिटल नियम, प्रादेशिक परिवहन

कोल्हापूर : जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी रुग्णवाहिकांचे निश्चित दरपत्रक वाहनात तसेच हॉस्पिटल गेटवर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी निर्देश जारी केले आहेत.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने 14 जुलै 2022 रोजी मंजूर केलेल्या दरांनुसार विविध प्रकारच्या रुग्णवाहिकांसाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

रुग्णवाहिकांचे अधिकृत दर

मारुती व्हॅन

20 किमी अथवा 2 तासांसाठी : ₹450

प्रति किमी भाडे (इंधनसहित) : ₹12

24 तासांसाठी (100 किमी मर्यादा) : ₹3,000

मासिक भाडे : ₹90,000

टाटा सुमो व मेटॅडोर सदृष्य वाहने

20 किमी अथवा 2 तासांसाठी : ₹600

प्रति किमी भाडे (इंधनसहित) : ₹14

24 तासांसाठी (100 किमी मर्यादा) : ₹3,500

मासिक भाडे : ₹1,05,000

टाटा 407, स्वराज माझदा, टेम्पो ट्रॅव्हलर, विंगर आदी वाहने

20 किमी अथवा 2 तासांसाठी : ₹700

प्रति किमी भाडे (इंधनसहित) : ₹20

24 तासांसाठी (100 किमी मर्यादा) : ₹4,500

मासिक भाडे : ₹1,35,000

वातानुकूलित रुग्णवाहिका

20 किमी अथवा 2 तासांसाठी : ₹900

प्रति किमी भाडे (इंधनसहित) : ₹19

वातानुकूलन यंत्रणा सुरू असल्यास नमूद दरात 10 टक्के वाढ

नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

या निर्णयामुळे रुग्णवाहिका सेवांमधील मनमानी दरांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांना अधिकृत दरांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. प्रशासनाने सर्व रुग्णवाहिका मालकांनी तत्काळ दरपत्रक प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.