अमृत संस्थेतर्फे युवकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कृषी ड्रोन वापर आणि डिजिटल मॅपिंगसह विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

May 18, 2026 - 23:35
 0  12
अमृत संस्थेतर्फे युवकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध
अमृत ड्रोन मिशन, मोफत ड्रोन प्रशिक्षण, ड्रोन पायलट कोर्स

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने युवकांसाठी “अमृत ड्रोन मिशन” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, सुरक्षा नियम, डिजिटल मॅपिंग, कृषी क्षेत्रातील ड्रोनचा वापर, हवाई सर्वेक्षण तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश असणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

अमृत संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवत असून २५ जातींचा लक्ष्यित गटात समावेश करण्यात आला आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या युवकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अधिक माहितीसाठी mahaamrut.org.in⁠� येथे भेट द्यावी किंवा अभिजीत कुलकर्णी (९११२२२८७६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 6
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2