हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त महाराष्ट्र सदन परिसरात तिरंगा रॅली

हर घर तिरंगा’ अभियानाचा महाराष्ट्र सदनात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला. अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.

Aug 14, 2026 - 04:03
Aug 22, 2026 - 18:37
 0  7
हर घर तिरंगा’ अभियानानिमित्त महाराष्ट्र सदन परिसरात तिरंगा रॅली
हर घर तिरंगा, तिरंगा रॅली, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली, श्वेता सिंघल, महाराष्ट्र शासन,

प्रतिनिधी नरेश शिंदे 

नवी दिल्ली, दि. १३ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा महाराष्ट्र सदनात उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या अभियानानिमित्त महाराष्ट्र सदन परिसरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर आणि देशभक्तीची भावना व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते तिरंगा रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सुरक्षा अधिकारी अनिल चोरगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.

हातात तिरंगा घेऊन राष्ट्रभक्तीचा संदेश

अभियानाच्या शुभारंभानंतर महाराष्ट्र सदन परिसरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेत राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.

रॅलीदरम्यान देण्यात आलेल्या राष्ट्रभक्तीपर घोषणांनी महाराष्ट्र सदनाचा परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदन परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

घराघरात तिरंगा फडकविण्याचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवून उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करावा, तसेच राष्ट्रध्वजाबद्दल आदर, अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नागरिकांनी मोठ्या संख्येने या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन ‘हर घर तिरंगा’चा संदेश घराघरात पोहोचवावा, असेही आवाहन करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.