इंडियन ऑइलच्या CSR उपक्रमातून सर जे. जे. रुग्णालयाला अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली
देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून Indian Oil Corporation Limited� च्या CSR उपक्रमांतर्गत सर जे. जे. रुग्णालय येथे अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करण्यात आली असून श्वसनविकारांच्या निदान प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. Indian Oil Corporation Limited च्या CSR उपक्रमांतर्गत सर जे. जे. रुग्णालय येथे अत्याधुनिक हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. इंडियन ऑइलच्या या सहकार्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांनाही सरकारी रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत.
सर जे. जे. रुग्णालयाच्या फुफ्फुसविकार विभागात दरमहा सुमारे ७० ते ८० ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया केल्या जातात. क्षयरोग, औषध-प्रतिरोधक क्षयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग, इंटरस्टिशियल लंग डिसीज आणि श्वसनमार्गातील अडथळे यांसारख्या गंभीर आजारांच्या निदानासाठी ब्रॉन्कोस्कोपी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
मात्र जुन्या आणि कालबाह्य उपकरणांमुळे अचूक निदानात अडचणी येत होत्या. नव्या हाय-डेफिनिशन प्रणालीमुळे श्वसनविकारांचे अधिक अचूक आणि जलद निदान शक्य होणार असून गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार सुरू करण्यास मदत मिळणार आहे.
या सुविधेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना खासगी रुग्णालयांतील महागड्या तपासण्यांचा खर्च टाळता येणार आहे. तसेच सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी CSR भागीदारीचे हे प्रभावी उदाहरण मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0