उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्र ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’; डेन्मार्कसोबत सहकार्याची नवी संधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ बनवण्याचा विश्वास व्यक्त केला. डेन्मार्कच्या राजदूतांसोबत गुंतवणूक, बंदर विकास, वॉटर टॅक्सी आणि ग्रीन तंत्रज्ञानावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

Apr 23, 2026 - 21:06
 0  3
उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्र ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’; डेन्मार्कसोबत सहकार्याची नवी संधी
महाराष्ट्र गुंतवणूक, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब, देवेंद्र फडणवीस, डेन्मार्क गुंतवणूक, वाढवण बंदर, वॉटर टॅक्सी प्रकल्प, इलेक्ट्रिक फेरी, ग्रीन पार्टनरशिप,

मुंबई, दि. २३ : राज्य शासनाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत असून ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून राज्याची ओळख निर्माण होत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भारतातील डेन्मार्कचे राजदूत रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी, बंदर विकास, शिपिंग, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी वाढवण बंदर प्रकल्पाची माहिती देत सांगितले की, या प्रकल्पामुळे महाराष्ट्र जागतिक सागरी नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवेल. लॉजिस्टिक्स आणि निर्यात वाढीस या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार आहे.

राज्यात जलवाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी वॉटर टॅक्सी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. इलेक्ट्रिक फेरी आणि इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तंत्रज्ञानासाठी डेन्मार्कच्या कंपन्यांशी भागीदारी करण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

डेन्मार्कचे राजदूत क्रिस्टेन्सेन यांनी सांगितले की, त्यांच्या देशाने किनारी भागात आणि अल्प अंतराच्या फेरी सेवांमध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला आहे. हे तंत्रज्ञान मुंबई–कोकण किनारपट्टीसाठी उपयुक्त ठरू शकते.

सध्या डेन्मार्कच्या सुमारे ६० कंपन्या मुंबई आणि पुणे परिसरात विविध क्षेत्रांत कार्यरत असून भारत–डेन्मार्क ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत महाराष्ट्र महत्त्वाचा भागीदार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0