विमानतळावर प्रवाशांची फसवणूक करणारा सराईत आरोपी मुंबई विमानतळ पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई विमानतळावर विद्यार्थी असल्याचे भासवून आणि विमानाचे तिकीट हरवल्याची खोटी कहाणी सांगून प्रवाशांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध देशातील विविध विमानतळ पोलीस ठाण्यांमध्ये १० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे
मुंबई : विद्यार्थी असल्याचे सांगून आणि विमानाचे तिकीट हरवल्याची खोटी कथा रचून प्रवाशांकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे उकळणाऱ्या सराईत फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबई विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव मोदेला वेंकट दिनेश कुमार (रा. गुंटूर, आंध्र प्रदेश) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 येथे आरोपीने स्वतःला नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे सांगितले. विमानाचे तिकीट हरवल्याने नवीन तिकीट काढण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगून त्याने एका प्रवाशाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर क्यूआर कोडद्वारे संबंधित प्रवाशाकडून 16 हजार रुपये घेतले. पैसे परत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आरोपीने संपर्क तोडला. Om
तक्रार दाखल झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी सतत आपले लोकेशन बदलत असल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मुंबईत आल्याची माहिती मिळवली आणि विमानतळ परिसरात सापळा रचून त्याला अटक केली.
अटकेदरम्यान आरोपीकडून तीन मोबाईल फोन, सहा सिमकार्ड, तीन बनावट ओळखपत्रे आणि 19,600 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
तपासात आरोपीविरुद्ध दिल्ली, बेंगळुरू, जयपूर, केरळ, आसाम तसेच मुंबईसह विविध राज्यांतील विमानतळ पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. आरोपीने घाईत असलेल्या प्रवाशांना लक्ष्य करून ही फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0