राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन; महाराष्ट्र सदनात कार्यक्रम संपन्न
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवासी आयुक्त आर विमला यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
नवी दिल्ली : थोर समाजसुधारक आणि ‘ग्रामगीते’चे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना अभिवादन करण्यात आले. नवी दिल्लीतील कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार तसेच महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
ग्रामविकास आणि समाजप्रबोधनाचा संदेश
याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी *‘ग्रामगीते’*च्या माध्यमातून मांडलेले ग्रामविकासाचे विचार, व्यसनमुक्तीचा संदेश आणि समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असून ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांचे विचार मार्गदर्शक ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0