चिंचवडमध्ये १० मे रोजी माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा महा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा
दक्ष नागरिक संघ, पुणे जिल्हाच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा महा मेळावा आणि पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन १० मे रोजी चिंचवड येथे करण्यात आले आहे. माहिती अधिकार, सेवा हमी कायदा आणि नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांबाबत मार्गदर्शन या कार्यक्रमात केले जाणार आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी चिंचवड : दक्ष नागरिक संघ, पुणे जिल्हाच्या वतीने माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा “माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा महा मेळावा व पुरस्कार वितरण समारंभ” रविवार, दि. १० मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चैतन्य सभागृह, बिजलीनगर रोड, चिंचवड येथे पार पडणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
प्रशासनाची जबाबदारी आणि नागरिकांचे अधिकार याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार असून विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि कामगार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे.
कार्यक्रमात माहिती अधिकार कायदा, दफ्तर दिरंगाई कायदा, सेवा हमी कायदा तसेच नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या विविध कायदेशीर अधिकारांबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी, माहिती मिळविण्याची प्रक्रिया, अर्ज व अपील पद्धती तसेच प्रशासनाकडून होणाऱ्या विलंबावर कायदेशीर उपाययोजना यासंदर्भात ॲड. अजित बोराडे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रवी लांडगे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संजीवन सांगळे, भाऊसाहेब भोईर, योगेश बहल, अनिल कदम-पाटील, श्याम लांडे, जितेंद्र ननावरे, उत्तम केंदळे, राजू बनसोडे, तुषार हिंगे, निलेश तरस, सुप्रियाताई चांदगुडे, योगिताताई नागरगोजे, इरफान भाई सय्यद, आझम खान, यशवंत भोसले, शांताराम कुंभार, अविनाश चिलेकर, सुरज साळवे आणि सुलभाताई उबाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन निलेश हाके यांनी केले असून सूत्रसंचालन ॲड. श्वेता मांडे (वैद्य) करणार आहेत.
दक्ष नागरिक संघाच्या वतीने सर्व नागरिक, माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी ७०५९ ३३० ३३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0