प्रभाग १६४ मधील नालेसफाईत हलगर्जीपणा; कंत्राटदारावर कारवाईची हरिष भांदिर्गे यांची मागणी

प्रभाग क्र. १६४ मधील पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

May 22, 2026 - 23:37
 0  8
प्रभाग १६४ मधील नालेसफाईत हलगर्जीपणा; कंत्राटदारावर कारवाईची हरिष भांदिर्गे यांची मागणी
हरिष भांदिर्गे, नालेसफाई, प्रभाग १६४, महापालिका, मुंबई नालेसफाई,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई : प्रभाग क्र. १६४ मधील पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा मुद्दा पुढे आणत आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी महापालिका प्रशासनाकडे संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रभाग क्र. १६४ अंतर्गत ओएसिस इमारतीजवळील नाला, नेव्ही गेट परिसरातील नाला, डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट समोरील नाला, एच.डी.आय.एल. वसाहत संकुलाच्या संरक्षण भिंतीलगतचा नाला, रामदेव पीर रोड येथील नाला, गावदेवी रहिवाशी संघ (भारतीय नगर) परिसरातील नाला तसेच संजय नगर भागातील नाले यांच्या साफसफाईसाठी संबंधित कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले होते.

मात्र, संबंधित कंत्राटदार मेसर्स राणूजादेव कॉर्पोरेशन यांनी अद्याप नाल्यांची योग्य आणि समाधानकारक साफसफाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे आगामी पावसाळ्यात सांडपाणी तुंबणे, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणे तसेच नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी पत्र पाठवून संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात संबंधित पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून करण्यात आलेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नालेसफाईची कामे तातडीने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पावसाळा तोंडावर असताना शहरातील नालेसफाईच्या कामांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0