भोंसला वॉकथॉन २०२६ : ज्येष्ठांच्या जिद्दीला सलाम; डॉ. प्रकाश जोशी, हरिश्चंद्र थोरात आणि केशव मोटे विजेते

भोंसला मिलिटरी कॉलेजच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित 'भोंसला वॉकथॉन २०२६' स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ८० वर्षांवरील गटात डॉ. प्रकाश जोशी, ७०-८० वयोगटात हरिश्चंद्र थोरात आणि ६०-७० वयोगटात केशव मोटे यांनी विजेतेपद पटकावत निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश दिला.

Jul 20, 2026 - 17:21
 0  46
भोंसला वॉकथॉन २०२६ : ज्येष्ठांच्या जिद्दीला सलाम; डॉ. प्रकाश जोशी, हरिश्चंद्र थोरात आणि केशव मोटे विजेते
भोंसला वॉकथॉन २०२६, भोंसला मिलिटरी कॉलेज, नाशिक,

नाशिक ब्यूरो 

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला मिलिटरी कॉलेजच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित 'भोंसला वॉकथॉन २०२६' स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वय हा केवळ आकडा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. स्पर्धेत ८० वर्षांवरील गटात डॉ. प्रकाश जोशी, ७० ते ८० वयोगटात हरिश्चंद्र थोरात आणि ६० ते ७० वयोगटात आंतरराष्ट्रीय धावपटू केशव मोटे यांनी अनुक्रमे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे उद्घाटन भोसला मिलिटरी स्कूल परिसरातील शहीद स्मारकाजवळ महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे राष्ट्रीय विपणन विभाग प्रमुख विनय खानोलकर, मेंदू विकास तज्ज्ञ डॉ. महेश करंदीकर आणि राहुल तारगे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.

यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भिडे, सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे, नाशिक विभागाचे उपाध्यक्ष डॉ. मनोहर शिंदे, कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ. विजयप्रसाद अवस्थी, आनंद देशपांडे, अजित भांदक्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिद्द, शिस्त आणि आरोग्याचा प्रेरणादायी संदेश

पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात आयोजित स्पर्धेत प्रथम ३ किलोमीटर, त्यानंतर ५ आणि ७ किलोमीटर गटातील स्पर्धकांना टप्प्याटप्प्याने मार्गस्थ करण्यात आले. वयाची साठी, सत्तरी आणि ऐंशी पार केलेल्या स्पर्धकांनी उत्साह, आत्मविश्वास आणि नियमित व्यायामाच्या बळावर प्रत्येक पाऊल टाकत उपस्थितांची मने जिंकली.

चालण्याची स्पर्धा असली तरी प्रत्येक स्पर्धक विजेतेपदासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून आले. मार्गाच्या दुतर्फा उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्पर्धकांचे उत्साहवर्धन केले. निरोगी जीवनशैली, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सकारात्मक जीवनदृष्टीचा संदेश देणारा हा उपक्रम संस्मरणीय ठरला.

स्पर्धेतील विजेत्यांना अॅड. अविनाश भिडे, हेमंत देशपांडे, डॉ. मनोहर शिंदे, डॉ. विजयप्रसाद अवस्थी आणि आनंद देशपांडे यांच्या हस्ते पारितोषिके आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. नितीन अहिरराव, नारायण गायधनी, समन्वयक संतोष जगताप तसेच क्रीडा शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडासंचालक केतन जाधव यांनी केले, तर समारोपप्रसंगी कार्याध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

स्पर्धेचे निकाल

३ किलोमीटर (पुरुष)

प्रथम : डॉ. प्रकाश जोशी (३६ मिनिटे)

द्वितीय : काशिनाथ देसाई (३९ मिनिटे)

तृतीय : सुभाष कोपरगावकर (४१ मिनिटे)

३ किलोमीटर (महिला)

प्रथम : सुहासिनी साठे

द्वितीय : शैलेजा शिंत्रे

तृतीय : सुमन चौधरी

५ किलोमीटर (पुरुष)

प्रथम : हरिश्चंद्र थोरात

द्वितीय : अशोक कोकाटे

तृतीय : सोपान गुरुळे

५ किलोमीटर (महिला)

प्रथम : शैलेजा जैन

द्वितीय : मंगला कुलकर्णी

तृतीय : प्रज्ञा गोखले

७ किलोमीटर (पुरुष)

प्रथम : केशव मोटे

द्वितीय : रविंद्र पाटील

तृतीय : एन. एम. कासार

७ किलोमीटर (महिला)

प्रथम : अंजली कुलकर्णी

द्वितीय : आनंदी पटेल

तृतीय : शरयू वाघ

भोंसला वॉकथॉन २०२६ ने ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करत "वय नव्हे, इच्छाशक्ती महत्त्वाची" हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यন্ত पोहोचवला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0