सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे मुंबईहून दिल्लीकडे प्रयाण

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी शिष्टमंडळासह मुंबई दौरा पूर्ण करून दिल्लीकडे प्रयाण केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

May 22, 2026 - 05:42
 0  5
सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांचे मुंबईहून दिल्लीकडे प्रयाण
निकोस क्रिस्टोडोलाइड्स, सायप्रस राष्ट्राध्यक्ष, मुंबई दौरा

मुंबई, दि. २१ : सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी मुंबई दौरा पूर्ण करून शिष्टमंडळासह दिल्लीकडे प्रयाण केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून त्यांनी दुपारी ४.१५ वाजता विमानाने दिल्लीकडे रवाना झाले.

राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्या निरोपासाठी विमानतळावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

तसेच पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि अन्य मान्यवरांनीही यावेळी उपस्थित राहून राष्ट्राध्यक्षांना निरोप दिला.

सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्या भारत दौऱ्यादरम्यान विविध आर्थिक, गुंतवणूक आणि द्विपक्षीय सहकार्याच्या विषयांवर चर्चा झाली. मुंबईतील विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवत भारत आणि सायप्रसमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला.

मुंबई दौरा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील नियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीकडे प्रयाण केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0