गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी शासनाने ४८ हजार लिटर अतिरिक्त केरोसीन मंजूर केले असून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना वितरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

May 13, 2026 - 23:50
 0  1
गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर
गडचिरोली, केरोसीन वितरण, सार्वजनिक वितरण प्रणाली, AAY, PHH, जिल्हा पुरवठा विभाग, मनोज डहाके, गडचिरोली बातमी, अतिरिक्त केरोसीन मंजुरी, महाराष्ट्र शासन

गडचिरोली, दि. १३ :

संभाव्य युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचा सामना करण्यासाठी स्वयंप्रकाश आणि दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीन वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण ४८ हजार लिटर अतिरिक्त केरोसीन मंजूर करण्यात आले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अतिरिक्त नियतन मंजूर केले आहे. तालुकानिहाय केरोसीनचा साठा उपलब्ध करून वितरण करण्यात येणार आहे.

यामध्ये गडचिरोली तालुक्यासाठी १२ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले असून धानोरा, सिरोंचा, आरमोरी, कुरखेडा, कोरची आणि चामोर्शी या तालुक्यांसाठी प्रत्येकी ६ हजार लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले आहे.

अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिकाधारकांना केरोसीन वितरणात प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच उपलब्धतेनुसार इतर शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाही केरोसीन वितरित करण्यात येणार आहे.

ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी उपलब्ध नाही, अशा कुटुंबांनाही आवश्यकतेनुसार केरोसीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज डहाके यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वयंप्रकाश आणि दिवाबत्तीसाठी आवश्यक असलेले केरोसीन जवळच्या अधिकृत केरोसीन विक्रेत्याकडून प्राप्त करून शासनाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0