सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक पदासाठी भरती; माजी सैनिकांना प्राधान्य
कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी १८ मेपर्यंत अर्ज सादर करावेत.
कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी सहाय्यक वसतिगृह अधीक्षक पद भरण्यात येणार आहे. हे पद तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असून निवड झालेल्या उमेदवारास दरमहा २४ हजार ८७५ रुपये एकत्रित मानधन देण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १८ मे रोजी दुपारपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध असून विहित नमुन्यातच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
प्राप्त अर्जांची पडताळणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती १९ मे रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहेत. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती, अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा. तसेच ९१७२०३५६१२ या मोबाईल क्रमांकावर किंवा ०२३१-२६६५८१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
