मिनी ट्रॅक्टर योजना : अर्ज सादर करण्यास 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा योजनेच्या अर्जाची मुदत 14 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी | उमेश जाधव
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून, पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांना आता 14 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या उपलब्धतेमुळे पात्र बचत गटांना शेतीशी संबंधित कामांसाठी आवश्यक यांत्रिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासह बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळणार आहे.
योजनेची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी संबंधित समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0