नेसरी येथे २१ मे रोजी रोजगार मेळावा; ९२९ पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी संधी

गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे २१ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून विविध खासगी कंपन्यांमधील ९२९ पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे.

May 18, 2026 - 18:57
May 18, 2026 - 18:57
 0  3
नेसरी येथे २१ मे रोजी रोजगार मेळावा; ९२९ पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी संधी
नेसरी रोजगार मेळावा, कोल्हापूर जॉब फेअर, रोजगार संधी,

कोल्हापूर,  दि. १८ (जिमाका) :

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, स्वामी प्रतिष्ठान ठाणे आणि तुकाराम कृष्णाजी कोळेकर आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालय, नेसरी यांच्या संयुक्त विद्यमाने २१ मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नेसरी येथील तुकाराम कृष्णाजी कोळेकर आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयात होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात २९ पेक्षा अधिक खासगी उद्योजक सहभागी होणार असून विविध क्षेत्रांतील सुमारे ९२९ पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या पदांसाठी किमान ८ वी, १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई., बी.कॉम., एमबीए., डी.फार्म, बी.फार्म तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र असतील.

इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे तसेच रिझ्युमच्या तीन प्रती सोबत आणाव्यात.

जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0