फुलसावंगी येथे भाजपाचा दणदणीत विजयोत्सव; मोदी नेतृत्वावर जनतेचा विश्वास

यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी येथे भाजपाने विधानसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

May 5, 2026 - 02:07
 0  6
फुलसावंगी येथे भाजपाचा दणदणीत विजयोत्सव; मोदी नेतृत्वावर जनतेचा विश्वास
फुलसावंगी बातमी, यवतमाळ भाजप, विजयोत्सव

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रवि वाघमारे 

यवतमाळ, दि. ०४ : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाने देशभरात विजयाचा जल्लोष साजरा केला. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे भाजपाच्या वतीने दणदणीत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

भाजपा तालुकाध्यक्ष योगेश वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. या विजयानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. हा विजय केवळ राजकीय नसून देशाच्या उज्ज्वल भविष्याचा संकेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला डॉ. चंदन पांडे, रवी पांडे, अमरदीप दळवी, गजानन प्रतापवार, प्रमोद शेळके, डॉ. गजानन वैद्य, धनंजय शेळके, प्रवीण जिल्हावार, तानाजी शिंदे, विशाल शिंदे, गजानन शिंदे, बंटी पांढरे, दिनेश सोनुने, अर्जुन सोनुने, विजय जाधव, रामू मोरे, विजय शिंदे, संदीप शेळके, योगेश चौधरी, निलेश भंडारकर, पवन पाचंगे, अथर्व मामीडवार, लखन घोडे, अक्षय घोडे, पवन दळवी, शिवम शेळके, विकी सूर्यवंशी, श्रेयश येलुरवार, श्रीनिवास पांडे, शुभम पठाण, रामा साखरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0