विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळालाही प्राधान्य द्यावे – महापौर रवि लांडगे

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित यशस्वी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत खेळांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

May 4, 2026 - 00:06
 0  3
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळालाही प्राधान्य द्यावे – महापौर रवि लांडगे
रवि लांडगे, पिंपरी चिंचवड महापौर, यशस्वी प्रीमियर लीग

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १ मे २०२६ – विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबतच खेळांनाही तितकेच महत्त्व द्यावे, असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित यशस्वी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.

यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने विविध औद्योगिक कंपन्यांमधील शिका आणि कमवा योजना तसेच अप्रेंटिस योजनेद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले की, क्रिकेटसारख्या खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, प्रसंगावधान, नेतृत्वगुण आणि शिस्त विकसित होते. युवाशक्ती बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतानाच शारीरिकदृष्ट्याही सक्षम राहणे आवश्यक आहे. त्यासाठी मैदानी खेळांचा मोठा फायदा होतो.

ते पुढे म्हणाले की, मैदानी खेळांमुळे मानसिक आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे युवा वर्गाने मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिवापरापासून दूर राहून खेळांकडे वळावे.

या स्पर्धेत यशस्वी संस्थेतर्फे एल अँड एल प्रोडक्ट कंपनीमध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघ विजेता ठरला. विजेत्या संघाला महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करंडक प्रदान करण्यात आला.

तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर आणि मालिकावीर ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेच्या ऑपरेशन विभागाचे प्रमुख कृष्णा सावंत, मार्केटिंग विभाग प्रमुख प्रशांत कुलकर्णी, फिल्ड ऑफिसर, सुपरवायझर, प्रशिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.