पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकन प्रक्रिया सुरू; अर्जाची अंतिम मुदत 31 जुलै 2026

पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकन आणि शिफारसी प्रक्रिया 15 मार्च 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे. अर्ज केवळ ऑनलाइन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर स्वीकारले जाणार आहेत.

Apr 29, 2026 - 00:41
Apr 29, 2026 - 13:09
 0  19
पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकन प्रक्रिया सुरू; अर्जाची अंतिम मुदत 31 जुलै 2026
पद्म पुरस्कार 2027, पद्मश्री अर्ज 2027, पद्मभूषण नामांकन, पद्मविभूषण

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कार 2027 साठी नामांकन व शिफारसी प्रक्रिया 15 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक नागरिक, संस्था किंवा व्यक्तींना 31 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

ही सर्व नामांकने आणि शिफारसी केवळ ऑनलाइन स्वरूपात राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर स्वीकारण्यात येणार असून https://awards.gov.in⁠� या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागणार आहे.

पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 26 जानेवारी 2027 रोजी करण्यात येणार आहे.

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात. 1954 साली प्रथमच या पुरस्कारांची सुरुवात झाली होती. दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.

कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान दिला जातो.

सरकारने पद्म पुरस्कारांना ‘सर्वसामान्यांचे पद्म पुरस्कार’ बनवण्याचा संकल्प केला असून नागरिकांनी स्वतःचे किंवा इतर पात्र व्यक्तींचे नामांकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषतः महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि निःस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे नामांकन करण्यावर भर देण्यात आला आहे.

अर्ज करताना संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती, कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, सेवा आणि कामगिरी यांचा स्पष्ट तपशील देणे आवश्यक आहे.

या संदर्भातील अधिक माहिती गृह मंत्रालयाच्या https://mha.gov.in⁠� संकेतस्थळावरील “Awards and Medals” विभागात तसेच https://padmaawards.gov.in⁠� या पोर्टलवर उपलब्ध आहे.

What's Your Reaction?

Like Like 6
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1