छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी – महापौर रवि लांडगे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्याच्या रक्षणासाठीचे बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस तसेच चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानातील त्यांच्या शिल्पास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे अद्वितीय शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वराज्याचे रक्षण करत दिलेले बलिदान इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या विचारांतून राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येकाने राष्ट्रहितासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य तुषार हिंगे, कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, रिटा सानप, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ नखाते, आबासाहेब ढवळे, वैभव जाधव, जीवन बोऱ्हाडे, सागर तापकीर, जितेंद्र छाबडा, संजय कुरबट्टी, हेमा पारिसकर, हेमलता वाडेकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0