महागावच्या मातोश्री विद्यालयाचा बारावी निकालाने गाजवला परिसर; विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमुळे परिसरात कौतुक होत आहे.

May 2, 2026 - 23:06
May 10, 2026 - 01:29
 0  9
महागावच्या मातोश्री विद्यालयाचा बारावी निकालाने गाजवला परिसर; विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल
मातोश्री विद्यालय महागाव, यवतमाळ

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी | रवि वाघमारे 

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या इयत्ता १२ वी (एचएससी) बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

विद्यालयाचा निकाल यंदाही प्रभावी ठरला असून विज्ञान शाखा (मराठी माध्यम) १०० टक्के निकालासह आघाडीवर राहिली. इंग्रजी माध्यम विज्ञान शाखेने ९९.१६ टक्के निकाल मिळवला, तर कला शाखेचा निकाल ९८.१४ टक्के लागला आहे.

विद्यालयातून एकूण २८५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १०१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून १३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय गुणवंत विद्यार्थी:

विज्ञान शाखा (मराठी माध्यम):

कु. सानिका अविनाश राऊत – ९२.६७%

कु. समृद्धी किशोर ठाकरे – ९२.००%

कु. पल्लवी बालाजी केंद्रे – ८७.००%

कला शाखा:

कु. संचिता गजानन बसवते – ७६.६७%

कु. श्रद्धा संजू अडगळे – ७५.६७%

कु. किरण विनोद राठोड – ७४.३३%

इंग्रजी माध्यम (विज्ञान):

शिवांग विकास मुलगे – ८९.००%

कु. अदिती परमेश्वर बिरादार – ८८.८३%

कु. वैदेही सुधीर भांगे – ८८.३३%

विद्यालयाचे संस्थापक डी. पी. जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या निस्वार्थ मार्गदर्शनाचे फलित असल्याचे सांगितले. मातोश्री विद्यालयाची यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी पुन्हा सिद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले.

निकाल जाहीर होताच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जल्लोष साजरा केला. महागावच्या शैक्षणिक क्षेत्रात मातोश्री विद्यालयाने पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0