बुलढाण्यात ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 17 किमी पायी मोर्चा
बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने अन्नदाता संघर्ष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. मानेगाव ते जळगाव जामोद अशी 17 किमी पदयात्रा काढण्यात येत असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात सरकारला इशारा देण्यात आला.
विदर्भ ब्यूरो अमोल सराफ
बुलढाणा, दि.: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा तसेच त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काढण्यात आली आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या पदयात्रेला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथून सोमवारी सकाळी 10 वाजता या पदयात्रेला सुरुवात झाली.
सुमारे 17 किलोमीटरचा प्रवास करत ही पदयात्रा जळगाव जामोद शहरात पोहोचणार असून रात्री जाहीर सभेने तिचा समारोप होणार आहे. या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या पदयात्रेचे आयोजक संदीप शेळके यांनी जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
