रामदास आठवले कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी निकाल ८२ टक्के; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील रामदास आठवले कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाच्या बारावी परीक्षेत ८२ टक्के निकाल नोंदवला. यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
हिंगोली | प्रतिनिधी : भगवानराव मस्के
ता. औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथील रामदास आठवले कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता १२ वी परीक्षेत ८२ टक्के निकालाची नोंद करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशस्वी निकालानिमित्त महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून, ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्याबद्दल संस्थेचे कौतुक होत आहे.
यंदाच्या परीक्षेत एकूण १७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर २६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रतिज्ञा रमेश सरतापे हिने ७७.३३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. किरण बन्सी रावळ याने ७५.३३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर भाग्यश्री बालाजी गिऱ्हे हिने ७२.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे बहुजन समाज जागृती संस्था अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, सचिव कुंडलीकराव कुटे, उपाध्यक्ष त्र्यंबकराव कुटे, प्राचार्य रामदास वाबळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?
Like
6
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1