दक्षिण महाळुंगे पोलिसांची मोठी कारवाई; २३ गुन्ह्यांची उकल करून ५२ लाखांचा मुद्देमाल मालकांना परत

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याने मोटारसायकल चोरी, घरफोडी आणि इतर चोरीच्या २३ गुन्ह्यांची उकल करत तब्बल ५२ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले.

May 17, 2026 - 00:26
 0  3
दक्षिण महाळुंगे पोलिसांची मोठी कारवाई; २३ गुन्ह्यांची उकल करून ५२ लाखांचा मुद्देमाल मालकांना परत
दक्षिण महाळुंगे पोलिसांची मोठी कारवाई; २३ गुन्ह्यांची उकल

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड, दि. १६ मे : दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याने विविध चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत २३ गुन्हे उघडकीस आणले असून, त्यामधील तब्बल ५२ लाख ९१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परिसरातील मोटारसायकल चोरी, वाहन चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यांची जलद उकल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विविध चोरीच्या घटनांचा तपास करत पोलिसांनी २३ गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत चोरीस गेलेल्या मोटारसायकली, सोन्याचे दागिने, मोबाईल, टेम्पो तसेच रोख रक्कम असा एकूण ५२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

न्यायालयाच्या आदेशानंतर हा मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्याचा कार्यक्रम दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ श्रीमती श्वेता खेडकर यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत देण्यात आला.

आपले मोबाईल, दागिने आणि वाहने परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक अनिल देवडे तसेच पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0