१३ लाख ६८ हजारांची चोरी उघड; नोकराला ४८ तासांत उत्तर प्रदेशातून अटक

मुंबईतील काळबादेवी परिसरात मसाल्याच्या दुकानातून १३.६८ लाखांची चोरी करणाऱ्या नोकराला पोलिसांनी ४८ तासांत उत्तर प्रदेशातून अटक करत मोठी रक्कम जप्त केली.

Apr 21, 2026 - 20:47
Apr 21, 2026 - 20:57
 0  3
१३ लाख ६८ हजारांची चोरी उघड; नोकराला ४८ तासांत उत्तर प्रदेशातून अटक
काळबादेवी पोलीस, नोकर अटक, 13 लाख चोरी, उत्तर प्रदेश अटक, क्राइम न्यूज मुंबई,

मुंबई ब्यूरो–अनिल सावरे 

 काळबादेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी जलदगतीने छडा लावत आरोपी नोकराला अवघ्या ४८ तासांत उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दुकानातील व्यवहारातून जमा झालेली १३ लाख ६८ हजार २०० रुपयांची रोख रक्कम दुकानातील गल्ल्यात ठेवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी ही रक्कम गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर काळबादेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता एक कामगार संशयाच्या भोवऱ्यात सापडला. संबंधित कामगार अचानक कामावर हजर नसल्याचे आढळून आले. तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे तो उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. आरोपीचे नाव अजय कुमार श्याम सुंदर यादव (वय २८) असे असून त्याच्याकडून सुमारे १० लाख ४७ हजार ५२० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणात आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी अल्पावधीत गुन्हा उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0