Ilaiyaraaja यांचे संगीत लाभलेल्या ‘ढसाळ’ बायोपिकची घोषणा; १ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित

पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ बायोपिक १ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत असून चित्रपटाला इलैयाराजा यांचे संगीत लाभले आहे.

Apr 16, 2026 - 01:44
 0  4
Ilaiyaraaja यांचे संगीत लाभलेल्या ‘ढसाळ’ बायोपिकची घोषणा; १ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित
ढसाळ’ बायोपिकची घोषणा;

मुंबई प्रतिनिधी - उदय कासारे 

मुंबई : दलित पँथरचे प्रणेते आणि विद्रोही कवी Namdeo Dhasal यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाचे पोस्टर भव्य सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आले. Dr. Babasaheb Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत मुंबईत हजारोंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली असून, ‘ढसाळ’ हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अभिनेता Lalit Prabhakar नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या लूकची झलक पोस्टरमधून समोर आली आहे. त्यांच्या बंडखोर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे चित्रण प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

संजय पांडेय निर्मित आणि वरुणा राणा दिग्दर्शित या चित्रपटात ढसाळ यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे वास्तववादी चित्रण करण्यात आले आहे. अन्यायाविरुद्धचा त्यांचा लढा, त्यांच्या कवितेतील विद्रोह आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारे विचार या चित्रपटातून मांडले जाणार आहेत.

या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे देशातील ख्यातनाम संगीतकार Ilaiyaraaja यांचे संगीत लाभले आहे. तसेच हिंदीतील गीतकार Irshad Kamil आणि मराठीतील Guru Thakur यांनी गीतलेखन केले आहे.

दिग्दर्शिका Varuna Rana यांनी सांगितले की, “नामदेव ढसाळ हे केवळ व्यक्तिमत्त्व नसून एक प्रक्षोभक विचार आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि कवितेतील विद्रोह पडद्यावर साकारताना मोठे आव्हान होते. हा चित्रपट एका चळवळीचा दस्तऐवज आहे.”

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना Lalit Prabhakar म्हणाले की, “ढसाळांसारखे दिसणे हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यांच्या विचारांशी जवळून परिचय होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

निर्माते संजय पांडेय यांनी सांगितले की, “नामदेव ढसाळ म्हणजे एक ज्वलंत विचारधारा आहे. त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवणे हे मोठे आव्हान आणि सन्मान आहे.”

पोस्टर आणि प्रदर्शन तारीख जाहीर झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, मराठी चित्रपटसृष्टीत हा चित्रपट महत्त्वपूर्ण ठसा उमटवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0