इंधन बचतीसाठी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा ताफा कमी करण्याचा निर्णय

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी इंधन बचत आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.

May 14, 2026 - 04:42
 0  4
इंधन बचतीसाठी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा ताफा कमी करण्याचा निर्णय
जिष्णु देव वर्मा, राज्यपाल, इंधन बचत, सुरक्षा ताफा, महाराष्ट्र गृह विभाग,

मुंबई :

इंधन बचत आणि मर्यादित संसाधनांचा कार्यक्षम वापर यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ही सूचना दिली आहे.

राज्यपालांनी राज्य शासनाच्या गृह विभागाला विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तर्कसंगत करण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत.

गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यपालांच्या सूचनांची माहिती दिली आहे.

पत्रात राज्यपालांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेऊन ऊर्जा बचतीच्या दृष्टीने आवश्यक तेवढ्याच वाहनांचा वापर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मर्यादित संसाधनांचा जबाबदारीने वापर आणि ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0