जनगणना २०२७ अंतर्गत ‘स्व-गणना’ प्रक्रियेत शासकीय कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा
जनगणना २०२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘स्व-गणना’ प्रक्रियेत राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाने केले आहे. १ मे ते १५ मे २०२६ दरम्यान नागरिकांना ऑनलाइन स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई, दि. ६ : भारत सरकारच्या जनगणना २०२७ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘स्व-गणना’ प्रक्रियेत राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.
जनगणना २०२७ ही प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी तयार करणे आणि घरगणना करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्याचे कामकाज १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
यापूर्वी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांसाठी ‘स्व-गणना’ करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून नागरिक स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरू शकणार आहेत.
केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने या जनगणनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना स्व-गणना पोर्टल� या संकेतस्थळाद्वारे स्व-गणना करता येणार आहे. यामुळे माहिती संकलन अधिक अचूक, कार्यक्षम आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाच्या अनुषंगाने या जनगणनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना स्व-गणना पोर्टल� या संकेतस्थळाद्वारे स्व-गणना करता येणार आहे. यामुळे माहिती संकलन अधिक अचूक, कार्यक्षम आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत पुढाकार घेऊन सहभाग नोंदवावा. डिजिटल इंडिया उपक्रमात महाराष्ट्राने नेहमीप्रमाणे आघाडी कायम ठेवावी, यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0