डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर सेवाकार्य; हजारो अनुयायांना अन्न व पर्यावरणपूरक साहित्याचे वाटप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पर्यावरण आघाडी आणि अज्ञान रिसर्च ॲन्ड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या वतीने हजारो अनुयायांसाठी अन्नदान व पर्यावरणपूरक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुंबई प्रतिनिधी - उदय कासारे
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे उत्साहपूर्ण आणि सेवाभावी वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पर्यावरण आघाडी आणि अज्ञान रिसर्च ॲन्ड एज्युकेशन ट्रस्ट (एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने चैत्यभूमीवर आलेल्या हजारो अनुयायांसाठी विशेष सेवाकार्य राबविण्यात आले.
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत संस्थेच्या वतीने उपस्थित अनुयायांना ‘व्हेज पुलाव’चे वितरण करण्यात आले. तसेच वाढते प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच अनुयायांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजय शंकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या उपक्रमात निलेश शहा, समाजभूषण पुरस्कार प्राप्त संजय धावारे, रतन अस्वारे, नितीन सावंत (पिंट्या), संजय कुडाळकर, शिवराम, सौ. संचिता कांबळे, कु. हर्षा भोसले, कु. सलोनी आणि सौ. शुभांगी यांच्यासह संपूर्ण टीमचा सक्रिय सहभाग होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादनासाठी दाखल झाले होते. अशा वेळी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन केलेले अन्नदान आणि पर्यावरणपूरक उपक्रम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि सेवा या विचारांना साजेसे ठरले. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0