कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महर्षी आनंद गुरुजी आश्रमाचे भूमिपूजन संपन्न
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महर्षी आनंद गुरुजी आश्रमाचे भूमिपूजन संपन्न; भाविकांसाठी सुविधा व धार्मिक उपक्रमांना चालना.
नाशिक ब्यूरो
नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर शिंदे टोल नाक्याजवळ डॉ. महर्षी आनंद गुरुजी यांच्या प्रेरणेतून उभारण्यात येणाऱ्या भव्य आश्रमाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी दक्षिण भारतीय राज्यांतून कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाव्यात, तसेच धार्मिक विधी सुलभ व्हावेत, यासाठी या आश्रमाची उभारणी करण्यात येत आहे. सनातन धर्माचा प्रचार-प्रसार, जनजागृती आणि आरोग्य संवर्धन हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिंदे गाव परिसरात आयोजित या सोहळ्यात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर तसेच विविध देवी-देवतांच्या प्रतिमांचे पूजन, मंत्रोच्चार, होम-हवन आदी धार्मिक विधी पारंपरिक दक्षिणात्य पद्धतीने करण्यात आले. त्यानंतर महर्षी आनंद गुरुजी यांच्या हस्ते भूमिपूजन करून आश्रम उभारणीचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई येथील A Plus Foundation कडून या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येणार असून डॉ. चांदनी मेहता आणि राकेश कुमार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
मार्गदर्शन करताना महर्षी आनंद गुरुजी यांनी आश्रमाच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट करत सांगितले की, धार्मिक उपक्रमांसोबतच आरोग्यविषयक आणि समाजजागृतीचे कार्यक्रम येथे राबविण्यात येतील. भविष्यात मराठी व हिंदी भाषेतूनही भाविकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी गोरख जाधव, बाळासाहेब तुंगार, नगरसेवक विशाल अण्णा संगमनेरे, डॉ. अक्षय पाटील, राकेश मेहता, डॉ. चांदनी मेहता, भाऊराव पाटील, रामदास तुंगार, संपतराव वाळुंज, सुप्रिया तुंगार, भाऊराव घुले, दादाभाऊ जाधव, शरद गायखे, दिलीप दीक्षित, शुभांगी शिंदे, मंजुनाथ आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोरख जाधव, भाऊराव तुंगार, शरद गायखे, संजय सानप, रामदास तुंगार, सचिन बिडवे यांनी विशेष प्रयत्न केले.
कुंभमेळ्यापूर्वी आश्रमाचे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला असून भाविकांसाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0