मुंबईत ट्रॅफिक आणि मोर्चामुळे आईची हाक: “माझं काय चुकलं?” पोस्ट व्हायरल
मुंबईतील ट्रॅफिक कोंडी आणि मोर्चामुळे मुलापर्यंत पोहोचू न शकलेल्या आईची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नागरिकांनी आंदोलने करताना सामान्य लोकांच्या अडचणींचा विचार करण्याची मागणी केली आहे.
मुंबई प्रतिनिधी - दिपक शिंदे
मुंबईतील वाहतूक कोंडी आणि मोर्चांमुळे सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा एक हृदयस्पर्शी प्रकार समोर आला आहे. एका आईने सोशल मीडियावर व्यक्त केलेली वेदना सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
“मी आई आहे, माझं काय चुकलं?” असा प्रश्न उपस्थित करत या महिलेने सांगितले की, तिचा मुलगा शाळा सुटल्यानंतरही तीव्र ट्रॅफिकमध्ये अडकून आहे. मोर्चा आणि रस्ते बंद असल्यामुळे तिला वेळेत मुलापर्यंत पोहोचता आले नाही.
या पोस्टमध्ये तिने आंदोलनकर्त्यांवर आणि प्रशासनावर अप्रत्यक्ष टीका करत म्हटले आहे की, मोर्चे संपल्यानंतर सर्वजण घरी जातील, मात्र एखाद्या मुलाला काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
आईच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून अनेकांनी तिच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. काहींनी आंदोलने करताना सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींचा विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे.
या घटनेतून मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि मोर्चांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. नागरिकांनी आणि प्रशासनाने यावर तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0