टेक वारी 2.0’मुळे महाराष्ट्र प्रशासनाला नवी दिशा : चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘टेक वारी 2.0’ उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले. मंत्रालयात आयोजित महासाधना सप्ताह समारंभात तंत्रज्ञानाधारित प्रशासन, डिजिटल साक्षरता आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर भर देण्यात आला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासनात नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगत ‘टेक वारी 2.0’मुळे राज्य प्रशासनाला नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन केले.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित ‘टेक वारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत महासाधना सप्ताहातील विशेष पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांपर्यंत सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध विभागांमध्ये तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती विकसित करणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ‘टेक वारी’ची तुलना पंढरपूरच्या वारीशी केली. प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक असून डिजिटल साक्षरता ही आजच्या काळातील खरी साक्षरता बनली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘टेक वारी 2.0’ ही केवळ कार्यशाळा नसून प्रशासनाच्या भविष्यकालीन तयारीचा महत्त्वाचा भाग आहे. राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचारी प्रत्यक्ष आणि नऊ लाखांहून अधिक कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून या उपक्रमाशी जोडले गेले असून हा देशातील सर्वांत मोठा तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण उपक्रम ठरल्याचा दावा त्यांनी केला.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही प्रशासन अधिक भविष्यवेधी बनविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला ‘फ्युचर रेडी’ बनविण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी ‘टेक वारी’अंतर्गत आयोजित विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. डीपीडीपी, सायबर सुरक्षा आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्या
त आला.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

