कल्याण गुन्हे शाखेची मोठी कारवाई – अवैध शस्त्रसाठा जप्त, सराईत गुन्हेगार अटक
कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ यांनी केलेल्या कारवाईत अवैध शस्त्रसाठा जप्त करून सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. आरोपीकडून पिस्तूल, रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे व इतर घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.
दिनांक: ०१/०४/२०२६
कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ यांनी अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध मोठी कारवाई करत त्याला अटक केली आहे.
गुन्हे शाखा, युनिट-३, कल्याण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५ वर्षे) याच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली.
छाप्यामध्ये आरोपीच्या घरातून खालीलप्रमाणे अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला: ३ देशी बनावटीची पिस्तुले, १ सिक्सर रिव्हॉल्वर, ७ गावठी कट्टे, १ रिकामी मॅगझिन, २ एअर गन, ४०५ जिवंत काडतुसे, १६७ जिवंत गोळ्या, २ धारदार लोखंडी तलवारी, ३ लोखंडी कोयते, १ धारदार सुरा, १ बटन चाकू, २ लोखंडी रॉड व २ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
तसेच आरोपीकडून सुमारे ₹३,५२,०००/- किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. एकूण जप्त मालाची किंमत सुमारे ₹१२,२१,०००/- इतकी आहे.
या प्रकरणी आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८३/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय शस्त्र कायदा कलम ३, ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून
तो पोलीस कोठडीत आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-३, कल्याण यांच्याकडून सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही यशस्वी कारवाई पार पाडली.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0