छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अभिवादन
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील लोकभवन आणि मंत्रालयात अभिवादन कार्यक्रम पार पडला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुंबई प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मुंबईत विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
मुंबई येथील लोकभवनात आयोजित कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.
दरम्यान, मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर तसेच सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, अवर सचिव रामदास कोळेकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, अमोल चव्हाण, विजय शिंदे आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राष्ट्रनिष्ठा, पराक्रम आणि स्वराज्य रक्षणासाठीच्या बलिदानाला अभिवादन केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

