मुंबईत आयईएस स्कील टेक विद्यापीठाला मंजुरी; २०२६-२७ पासून सुरू होणार
राज्य मंत्रिमंडळाने इंडियन एज्युकेशन सोसायटीला मुंबईत आयईएस स्कील टेक विद्यापीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली असून हे विद्यापीठ २०२६-२७ पासून सुरू होणार आहे. कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत इंडियन एज्युकेशन सोसायटीला मुंबईत आयईएस स्कील टेक विद्यापीठ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. वांद्रे येथे उभारण्यात येणारे हे विद्यापीठ २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असून, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे.
मुंबईत कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थेस मुंबईत आयईएस स्कील टेक विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.
हे विद्यापीठ वांद्रे येथे उभारण्यात येणार असून ते कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ म्हणून कार्यरत राहील. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून या विद्यापीठाची सुरुवात होणार आहे.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता यासाठी केंद्र सरकारने २०१५ मध्ये राष्ट्रीय धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार रोजगाराच्या संधी आणि उपलब्ध मनुष्यबळ यामधील अंतर कमी करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
राज्यात ‘कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ या धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २०२१ मध्ये खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली होती.
या विद्यापीठामध्ये विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकवले जाणार असून, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी निगडित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होऊन राज्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0