१३ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या – आ. राजेश क्षीरसागर

करवीर तालुक्यातील १३ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी कामांमध्ये गती आणण्याचे निर्देश दिले. ३४३ कोटी रुपयांच्या या योजनेचे ५१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिली.

May 15, 2026 - 21:48
 0  2
१३ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या – आ. राजेश क्षीरसागर
राजेश क्षीरसागर, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, करवीर तालुका,

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील १३ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती देण्याचे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की, ३४३ कोटी रुपयांच्या या योजनेमुळे परिसरातील १३ गावांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे. निधी वेळेत प्राप्त न झाल्यामुळे कंत्राटदारांनी कामात कोणतीही दिरंगाई करू नये. उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालय स्तरावर स्वतः पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, उर्वरित कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. कामात निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील यांनी योजनेचे सुमारे ५१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. बैठकीला उपअभियंता पी. एच. गायकवाड तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0