केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून ‘महालक्ष्मी सरस’चे कौतुक; उमेदच्या उत्पादनांची चव पोहोचणार मंत्र्यांच्या किचनमध्ये
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईतील महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देत उमेद अभियानाच्या महिला उद्योजकांचे कौतुक केले. त्यांनी काही उत्पादनांची खरेदी करून महिलांना प्रोत्साहन दिले.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे: ‘महालक्ष्मी सरस’ हे केवळ प्रदर्शन नसून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचे मोठे व्यासपीठ असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले. वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू असलेल्या प्रदर्शनाला भेट देत त्यांनी विविध स्टॉल्सची पाहणी केली.
यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध उत्पादनांची माहिती घेतली तसेच ‘उमेद’ अभियानातील महिला उद्योजकांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला.
‘लखपती दीदी’ संकल्पाला बळ
भेटीदरम्यान बोलताना ना. आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 1 कोटी ‘लखपती दीदी’ घडवण्याचा संकल्प केला आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी महालक्ष्मी सरससारखे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे प्रदर्शन प्रभावी व्यासपीठ असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जयकुमार गोरे यांच्या कार्याचे कौतुक
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन आणि ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबद्दल त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात ग्रामविकास विभागाचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या किचनमध्ये पोहोचणार ग्रामीण चव
प्रदर्शनातील शुद्ध, गावरान आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले मसाले, धान्य आणि खाद्यपदार्थ पाहून ना. आठवले प्रभावित झाले.
या उत्पादनांची चव आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या किचनमध्ये पोहोचणार असून त्यांनी स्वतः काही उत्पादनांची खरेदी करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0