एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियान’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

एसटीच्या रस्ता सुरक्षा अभियानासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जनजागृती मोहिमांना चालना मिळणार आहे.

Apr 23, 2026 - 04:59
 0  1
एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियान’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर
एसटी रस्ता सुरक्षा अभियान, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, ब्रँड ॲम्बेसेडर, महाराष्ट्र परिवहन विभाग, एसटी महामंडळ, रस्ता सुरक्षा, जनजागृती मोहीम,

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा अभियान’ला अधिक प्रभावी करण्यासाठी लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या नियुक्तीचा करार पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे एसटी महामंडळाच्या विविध जनजागृती मोहिमा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अधिक परिणामकारक करणे हा आहे.

रस्ता सुरक्षा, प्रवासी जनजागृती आणि सामाजिक संदेशांचा प्रसार यासाठी रितेश-जेनेलिया देशमुख यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवासाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0