विश्वशांती महानुष्ठानात 234 युनिट रक्तदान; मुनिंद्र धर्मार्थ ट्रस्टच्या समाजसेवेचा अहिल्यानगरमध्ये गौरव
सतलोक आश्रम ढवळपुरी येथे आयोजित विश्वशांती महानुष्ठान संमेलनादरम्यान 234 युनिट रक्तदान संकलित करण्यात आले. या समाजोपयोगी कार्यासाठी मुनिंद्र धर्मार्थ ट्रस्टला अहिल्यानगर येथे गौरविण्यात आले. रक्तदान, मानवकल्याण, व्यसनमुक्ती, हुंडामुक्त विवाह आणि अध्यात्मिक जनजागृतीसाठी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
नाशिक ब्युरो: मुनिंद्र धर्मार्थ ट्रस्ट संचलित सतलोक आश्रम, ढवळपुरी येथे 1, 2 आणि 3 मे 2026 रोजी संपूर्ण विश्वाच्या शांततेसाठी संत रामपाल जी महाराज यांच्या सानिध्यात भव्य "विश्वशांती महानुष्ठान संमेलन" आयोजित करण्यात आले होते. या महासमागमादरम्यान जनकल्याण रक्तकेंद्राच्या माध्यमातून महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिराला संत रामपाल जी महाराज यांच्या अनुयायांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे एका दिवसात तब्बल 234 युनिट रक्तसंकलन करून उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार असून समाजसेवेचा आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या कार्याचा गौरव करण्यासाठी 16 मे 2026 रोजी अहिल्यानगर येथील हॉटेल यश ग्रँड येथे जनकल्याण रक्तकेंद्रामार्फत "रक्तदान शिबिर संयोजक गौरव पुरस्कार व स्नेह मेळावा" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुनिंद्र धर्मार्थ ट्रस्ट संचलित सतलोक आश्रम, ढवळपुरीच्या आश्रम समितीला संत रामपाल जी महाराज यांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मुनिंद्र धर्मार्थ ट्रस्टच्या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक केले. रक्तदान, मानवकल्याण, व्यसनमुक्ती अभियान, हुंडामुक्त विवाह, सर्वधर्मसमभाव आणि अध्यात्मिक जनजागृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
संत रामपाल जी महाराज यांचे ब्रीदवाक्य – "जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नही कोई न्यारा" – समाजात एकात्मता आणि मानवतेचा संदेश देणारे असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
यावेळी "विश्वात शांतता, मानवतेत बंधुभाव आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाज परिवर्तन" हा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच 27, 28 आणि 29 जून 2026 रोजी सतलोक आश्रम, ढवळपुरी येथे आयोजित "परमेश्वर कबीर साहेब प्रकट दिवस" महासमागमासाठी उपस्थितांना सहपरिवार निमंत्रित करण्यात आले.
आयोजकांनी सांगितले की, अध्यात्म आणि मानवसेवा यांचा संगम घडवून समाजात शांतता, सहकार्य आणि मानवतेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.
गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी अन्न, कपडे, शिक्षण, आरोग्य मदत आणि निवाऱ्याच्या स्वरूपात "अन्नपूर्णा मोहिम" देशभरात राबवली जात आहे. नैसर्गिक आपत्ती, पूर, महामारी किंवा संकटाच्या काळात सतलोक आश्रमामार्फत मोठ्या प्रमाणात मदतकार्यही केले जाते.
याशिवाय मोफत नेत्रतपासणी, दंतचिकित्सा शिबिरे, अवयवदान आणि देहदान जनजागृतीसारखे सामाजिक उपक्रमही सातत्याने राबवले जात आहेत. शास्त्राधारित अध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, सामाजिक रूढी आणि वाईट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

