बुलढाणा : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत १६ हजार १७७ लाभार्थ्यांना जोडणी
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या विस्तारीत टप्पा-२ व ३ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात १६ हजार १७७ लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात आली असून, महिलांच्या आरोग्य व पर्यावरण संरक्षणाला चालना मिळत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात विस्तारीत टप्पा-२ व ३ मध्ये एकूण १६ हजार १७७ लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वच्छ व सुरक्षित इंधन उपलब्ध करून देणे, धूरमुक्त स्वयंपाकघर निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. यापूर्वी टप्पा-१ मध्ये १.८९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता.
बुलढाणा (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्यात आल्या असून, विस्तारीत टप्पा-२ व ३ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार १७७ लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या विस्तारीत टप्पा-१ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ८९ हजार ३४७ लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला होता. त्यानंतर केंद्र शासनाने देशभरात विस्तारीत टप्पा-२ मध्ये ७५ लाख व टप्पा-३ मध्ये २५ लाख अशा एकूण १ कोटी अतिरिक्त गॅस जोडण्यांना मंजुरी दिली आहे.
त्याअनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात विस्तारीत टप्पा-२ अंतर्गत ८ हजार ६९४ तर टप्पा-३ अंतर्गत ७ हजार ४८३ लाभार्थ्यांना गॅस जोडणी देण्यात आली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना स्वच्छ, सुरक्षित व परवडणारे एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच पारंपरिक इंधनाचा वापर कमी करून महिलांचे व कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यास मदत करणे, धूरमुक्त स्वयंपाकघर निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे हेही या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0