माजी महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अभिवादन
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी, दि. ६ जून २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
पिंपरी वाघेरे येथील दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही त्यांच्या कार्याला उजाळा देत विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर संजोग वाघेरे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी नगरसदस्य प्रभाकर वाघेरे, दत्तात्रय वाघेरे, उषा वाघेरे, उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवंगत भिकू वाघेरे पाटील यांनी पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0