महाराणा प्रताप जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील लोकभवन आणि मंत्रालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे, तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
. मुंबई प्रतिनिधी: नरेश शिंदे
मेवाडचे शूर योद्धे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे तर कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
लोकभवन येथे राज्यपालांचे अभिवादन
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून आदरांजली अर्पण केली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.
मंत्रालयात मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन
महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी निलेश हरड, सहायक कक्ष अधिकारी अमोल चव्हाण, विजय शिंदे तसेच मंत्रालयातील विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेच्या कार्याला अभिवादन केले.
शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक
महाराणा प्रताप हे भारतीय इतिहासातील पराक्रम, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती निष्ठेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याची आठवण जागविण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0