मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ‘गोदा ते नमदा’ पदयात्रेसाठी दूधगंगा जलकलश पूजन

कोल्हापुरात मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ‘गोदा ते नमदा’ पदयात्रेसाठी दूधगंगा नदीच्या जलकलशाचे पूजन करण्यात आले. जलसंवर्धन आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा प्रसार हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Apr 23, 2026 - 14:23
 0  2
मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ‘गोदा ते नमदा’ पदयात्रेसाठी दूधगंगा जलकलश पूजन
मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ‘गोदा ते नमदा

कोल्हापूर येथे ‘गोदा ते नमदा’ पदयात्रेच्या निमित्ताने दूधगंगा नदीच्या जलकलशाचे पूजन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ (१५ ते ३० एप्रिल २०२६) राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत ‘गोदा ते नमदा’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याचा एक महत्त्वाचा टप्पा कोल्हापुरात पार पडला. शासकीय विश्रामगृह येथे दूधगंगा नदीच्या जलकलशाचे पूजन करून तो जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

ही पदयात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी चौंडी तसेच गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथून एकाच वेळी सुरू होणार आहे. शिर्डी येथे या दोन्ही यात्रा एकत्र येऊन पुढे मध्यप्रदेशातील महेश्वरकडे मार्गक्रमण करतील. २५ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत ही पदयात्रा पार पडणार आहे.

या पदयात्रेचा उद्देश केवळ जलसंवर्धन नसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक कारभार, स्त्री नेतृत्व, न्याय, समता आणि सेवा या मूल्यांचा प्रसार करणे हा आहे. तसेच धर्म, संस्कृती आणि समाजहित जपत ही मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0