जायकाकडून ३,७०८ कोटींची मदत; राज्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा होणार सशक्त

राज्यातील वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग आणि आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी जायकाकडून ३,७०८ कोटी रुपयांची आर्थिक मदत घेण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा सशक्त करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) कडून ३,७०८ कोटी रुपयांची आर्थिक सहाय्यता घेण्यास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांतर्गत वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज आणि रुग्णालयांची पायाभूत सुविधा व अत्याधुनिक यंत्रसामुग्री उभारली जाणार आहे.

Apr 14, 2026 - 06:53
 0  2
जायकाकडून ३,७०८ कोटींची मदत; राज्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा होणार सशक्त
जायका प्रकल्प, महाराष्ट्र आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग कॉलेज, सरकारी रुग्णालय, आरोग्य पायाभूत सुविधा, मंत्रिमंडळ निर्णय, JICA India, हेल्थकेअर प्रोजेक्ट

राज्यातील वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) कडून ३ हजार ७०८ कोटी रुपयांची आर्थिक सहाय्यता घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील नागरिकांना किफायतशीर दरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी ‘स्ट्रेन्थनिंग टर्शरी हेल्थ केअर डिलीव्हरी, मेडिकल एज्युकेशन सिस्टीम अँड नर्सिंग सिस्टीम इन महाराष्ट्र’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत वर्धा, पालघर, रत्नागिरी आणि अहिल्यानगर येथील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना बळकटी देण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालय, धुळे, सोलापूर, अंबेजोगाई, अकोला, नागपूर (IGMC), रत्नागिरी, पालघर आणि धाराशिव येथील नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे.

याशिवाय बारामती, मिरज (सांगली) आणि कोल्हापूर येथे नवीन नर्सिंग महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. विविध जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.

तसेच भारत-जपान शैक्षणिक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत रुग्णालय व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकासासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांना दर्जेदार उपचार सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0