कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गावाजवळ महर्षी आनंद गुरुजी आश्रमाचे भूमिपूजन उद्या
नाशिकजवळ शिंदे गावात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महर्षी आनंद गुरुजी आश्रमाचे भूमिपूजन उद्या होणार.
नाशिक ब्यूरो
सिंहस्थ कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर नाशिक–त्र्यंबकेश्वर परिसरात विविध धार्मिक उपक्रमांना वेग येत असून, शिंदे गावाजवळ महंत डॉ. महर्षी आनंद गुरुजी यांच्या आश्रमाचे भूमिपूजन उद्या पार पडणार आहे.
शिंदे गाव, नाशिक-पुणे महामार्गालगत उभारण्यात येणारा हा आश्रम पुढील दीड वर्षांत पूर्ण होणार असून, येथे धार्मिक तसेच आरोग्य संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
गुरुवार, ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता डॉ. महर्षी आनंद गुरुजी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ होणार असून या कार्यक्रमाला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील साधू-संत आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
डॉ. महर्षी आनंद गुरुजी हे आध्यात्मिक विचारवंत व मानवता, शांतता आणि सुखाचा संदेश देणारे प्रवचनकार म्हणून ओळखले जातात. बेंगळुरू येथे ब्रह्मरूपी आनंद सिद्धिपीठाचे संस्थापक असून ‘महर्षी वाणी’ या कार्यक्रमाद्वारे ते भक्तांना मार्गदर्शन करतात.
या कार्यक्रमाला शक्ती महाराज, महाकाल स्वामीजी महाराज, तसेच नाशिकचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिंदे गावचे सरपंच गोरख जाधव, रामदास तुंगार, भाऊराव तुंगार, शरद गायखे, संजय सानप, सचिन बिडवे आणि दिलीप दीक्षित प्रयत्नशील आहेत.
कुंभमेळ्याच्या काळात या आश्रमाचे महत्त्व वाढणार असून भाविकांसाठी हे एक प्रमुख श्रद्धास्थान ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0