ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; राज्यभरातून श्रद्धांजली, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. राज्यपाल, मुख्यमंत्री व विविध मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली असून दादर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Apr 14, 2026 - 02:38
 0  4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; राज्यभरातून श्रद्धांजली, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आशा भोसले निधन, , राज्यपाल विष्णू देव वर्मा देवेंद्र फडणवीस, श्रद्धांजली, दादर स्मशानभूमी, मराठी संगीत

मुंबई, दि. १३ – ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली असून राज्यभरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

सोमवारी दादर येथील कै. भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले व कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध मान्यवरांनीही श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी अभिनेते रितेश देशमुख, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशाताईंना अखेरचा निरोप दिला.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आशाताईंनी मांडलेला प्रस्ताव पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आशा भोसले यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय नेते, कलावंत व चाहत्यांनी उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहिली.

आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गाऊन भारतीय संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राने एक युगप्रवर्तक कलाकार गमावला आहे

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0