गोदा ते नर्मदा’ जलयात्रा २०२६ चे भव्य आयोजन; त्र्यंबकेश्वरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ अंतर्गत जलसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी राज्यभर भव्य जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून जलयात्रेला प्रारंभ होणार असून विविध शहरांमधून प्रवास करत ही यात्रा महेश्वर येथे संपन्न होणार आहे.

Apr 23, 2026 - 22:41
Apr 23, 2026 - 22:48
 0  1
गोदा ते नर्मदा’ जलयात्रा २०२६ चे भव्य आयोजन; त्र्यंबकेश्वरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
गोदा ते नर्मदा’ जलयात्रा २०२६

नाशिक ब्यूरो: जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अंतर्गत ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या जलयात्रेतून जलसंवर्धनाचा व्यापक संदेश राज्यभर पोहोचवण्याचा संकल्प असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

ही जलयात्रा ‘विचार, वारसा आणि विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री  सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे, लोकसहभाग वाढवणे आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना मजबूत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

२५ एप्रिल २०२६ रोजी श्रीक्षेत्र चोंडी (जन्मस्थान) आणि त्र्यंबकेश्वर  मंदिर  (गोदावरी उगमस्थान) येथून एकाच वेळी जलयात्रेला प्रारंभ होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

चोंडी येथून निघणारी यात्रा अहिल्यानगर येथे मुक्काम करेल, तर त्र्यंबकेश्वर येथून निघणारी यात्रा नाशिक, सिन्नर  आणि संगमनेर  मार्गे २६ एप्रिल रोजी Shirdi येथे एकत्र येईल.

यानंतर यात्रा कोपरगाव,  वैजापूर,  गंगापूर  मार्गे  छत्रपती संभाजी नगर  आणि गृष्णेश्वर मंदिर येथे मुक्काम करेल. पुढे २८ एप्रिल रोजी कन्नड, चाळीसगाव  आणि धुळे येथे पोहोचेल.

२९ एप्रिल रोजी महेश्वर येथे जलयात्रेचा समारोप होणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0